तुंगत हे गाव सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पूर्वेकडील दिशेस वसलेले आहे. तुंगत गाव हे उंच टेकडीवर वसलेले असून नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध आहे.
• पंढरपूरपासून अंतर: १६ कि.मी • सोलापूरपासून अंतर: ५० कि.मी • क्षेत्रफळ: १८६.५४ हेक्टर • लोकसंख्या: 5275
तुंगत गाव हे पंढरपूरच्या पूर्वेला स्थित असून गावातील तुंगेश्वर मंदिर हे प्राचीन महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या नावावरून गावाचे नाव “तुंगत” पडले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार गावामध्ये सुमारे १११४ कुटुंबे असून पुरुष संख्या २०९२ व महिला संख्या २१६३ आहे.
तुंगेश्वर मंदिर
तुंगत गावातील तुंगेश्वर मंदिर हे प्राचीन महादेव मंदिर असून गावाचे धार्मिक केंद्र आहे. या मंदिराच्या नावावरून गावाचे नाव “तुंगत” पडले आहे.
श्री तुंगेश्वर विद्यालय
तुंगत गावातील “श्री तुंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय” ही एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. गावाचे ग्रामदैवत श्री तुंगेश्वर यांच्या नावावरून या विद्यालयाचे नामकरण करण्यात आले आहे.
या विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वी तसेच ११ वी व १२ वी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. हे विद्यालय पंढरपूर तालुक्यातील एक जुनी, शिस्तप्रिय व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळखले जाते.